या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
एक वेधी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकणी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपदोल्लसल्लोहलताकण्टक भूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रि र्भयंकरी।।
कालरात्रि :
दुर्गामातेचे सातवे रूप ” कालरात्रि ” असे आहे . देवीच्या शरीराचा रंग काळा असल्याने तिचे हे रूप बघायला अतिशय भितीदायक आहे. देवीचे डोक्यावरील केस हे विखुरलेले आहेत. कालरात्रि देवीचे रूप अतिशय भितीदायक जरी असले तरी हि देवी शुभदायीनी आहे, म्हणूनच ह्या देवीला “शुभंकारी” असे देखील संबोधण्यात येते. देवीला चार भुजा असून एका भुजेची वरमुद्रा, दुस-या भुजेची अभयमुद्रा, तिस-या भुजेत लोखंडी कोयता तर चौथ्या भुजेत कट्यार आहे. ह्या देवीचे वाहन गाढव आहे.