दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी. महागौरी देवीने स्वत:च्या पूर्व जन्मात भगवान श्री शंकराला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती, ही कठोर तपस्या करत असतांना देवीचे शरीर निस्तेज होऊन पूर्ण काळे झाले होते. देवीची कठोर तपस्या बघून भगवान श्री शंकराला तिची दया आली व त्यांनी देवीचे शरीर गंगेच्या पवित्र द्रव्याने स्वच्छ केले त्यामुळे देवीचे शरीर गौरवर्णी दिसू लागली. म्हणूनच देवीला ” महागौरी ” असे संबोधण्यात आले. देवीला चार भुजा आहेत. एका भुजेची अभयमुद्रा, दुस-या भुजेत त्रिशूल, तिस-या भुजेत डमरू तर चौथ्या भुजेची वरमुद्रा आहे. देवीचे वाहन बैल आहे. महागौरी देवी कुमारीका अवस्थेत असल्याचे समजते म्हणुन ह्या देवीच्या पुजनाच्या दिवशी कुमारीकांचे पुजन देखील केले जाते.