या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥
सिद्धीदात्री :
माता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री. सिद्धिदात्रीदेवी कमळाच्या फुलात विराजमान असते. ह्या देवीला चार भुजा असून डाव्या भुजेत चक्र आणि गदा, तर उजव्या भुजेत शंख आणि कमळाचे फुल आहे.
तिचे वाहन सिंह आहे. सिद्धीदात्री देवी सिद्धिप्रदान करणारी देवी असून पुराणात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धी सांगण्यात आलेल्या आहेत.