Ya Balano Ya Re Ya Lyrics
“या बालांनो या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.
खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडेतिकडे फुलें फळें
सुवास पसरे रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे हेरावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !
पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरें मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती
हरिण किती !
देखावे
देखावे.
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !”