Asava Sunder Chocolatecha Bangla Lyrics
“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
‘हॅलो हॅलो !’ करायला छोटासा फोन.
बिस्कटांच्या गच्चीिवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.”