Gori Gori Pan Fulasarkhi Chan Lyrics


“गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्यागोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !”

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading