Shala Sutali Pati Phutali Lyrics
“शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग खमंग चकली
दे ना लवकर भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ भूक लागली”