Chandoba Chandoba Bhaglas Ka Lyrics
“चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.
आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध न् शेवया खाशील का?
आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?
चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?”