Gamatidar Tomne Cha Sangrah


गमतीदार टोमणे

“पुरषाची उक्रांती :
लग्न न करणारा पुरष SPIDERMAN
लग्नाच्या वेळेला पुरष SUPERMAN
लग्नानंतर पुरष GENTLEMAN
आणि जर बायको सुंदर असेल तर अख्या आयुष्भर WATCHMAN”

“येतात ते येतात उशिरा येतात,
बसतात ते बसतात पुढेच बसतात,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात,
त्यांना विचार तर,
त्या दात कश्याने घासतात.”

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल, मागे वळून पाहिले कि म्हणतो,
एप्रिल फूल,एप्रिल फूल”

“पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते,
ती एकटीच दात घासते .”

“कशाला करतेस बॉय कट, कशाला करतेस बॉब कट,
कशाला करतेस उगीच कट कट,
एकदाच करून टाक गांधी कट.”

“बघणारा असेल कोणी तर, दाढी करण्यात अर्थ आहे.
जर कोणीच बघणार नसेल तर अंघोळ सुद्धा व्यर्थ आहे.”

“जगातील अंतिम सत्य….
अभ्यास व व्यायाम नेहमी
उद्यापासून चालू होतो…
आणि दारु व सिगरेट उद्यापासून बंद”

“मंगळसूत्र
गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सख्त मजूरी
गळ्यात घालण्याराला जन्म ठेप
घोर अन्याय”

“वाटणा फुटाणा शेंगदाणा, उडत चालल्या टणा टणा”
“स्वताला समजतो मिथुन आणि ड्रेस उचलतो इथून -तिथून”

“लिहुन लिहुन झिजले खडु…. लिहुन लिहुन झिजले खडु….
आता तरी द्या लग्नाचे लाडु…….”

“हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू ….. ह्या दोघांची तर एक च गंगू”

More Entries

  • Pati – Patni Tomne Sangrah

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading