Tu Maza Morpis Aahes
मोरपीस कितीही अंगावर फिरवलं,
मनावर फिरवलं,
तरीही त्याचा कधी ओरखडा येतो का…?
अरे वेड्या,
तू मला कसं दुखावशिल मग….?
कारण, तू माझा मोरपीस आहेस…!!!
माझ्या मनाचा आवाज जरा ऐकशील का?
हळूच येऊन माझ्यापाशी डोळ्यांनीच काही बोलशील का?
मान्य आहे घाबरतेस तु , पण तरीही
फक्त एक दिवस माझ्यासोबत स्वैर कुठे भटकशील का?
डोळे तुझे इशारे त्यांचे माझ्यावरच रोखशील का?
ओठ तुझे शब्द त्यांचे फक्त मलाच ऐकवशील का?
मान्य आहे प्रेम करतेस तू ,पण तरीही
सर्वांसमोर एकदातरी व्यक्त ते करशील का?
कुणाच्या भावना दुखावतील
असं कधी वागलोच नाही मी
बोललोही असेल कदाचित गमतीने
पण कुणाला दुखवणारा नाही मी
काचासारखा पारदर्शी आणि
पाण्यासारखा निर्मळ मी
पारा लावला तर तुम्हीच दिसणार
रंगहीन मी तुमच्या रंगात मिसळणार
असाच आहे मी खोडकर विनोदी
झालो नाही मी स्वार्थी कधी
सर्कस मधला जोकर आहे मी
रडत असलो तरी हसवत राहणारा मी
दुःख मनाला झालं की
कोपऱ्यात जाऊन रडणारा मी