Asach Aahe Mi
कुणाच्या भावना दुखावतील
असं कधी वागलोच नाही मी
बोललोही असेल कदाचित गमतीने
पण कुणाला दुखवणारा नाही मी
काचासारखा पारदर्शी आणि
पाण्यासारखा निर्मळ मी
पारा लावला तर तुम्हीच दिसणार
रंगहीन मी तुमच्या रंगात मिसळणार
असाच आहे मी खोडकर विनोदी
झालो नाही मी स्वार्थी कधी
सर्कस मधला जोकर आहे मी
रडत असलो तरी हसवत राहणारा मी
दुःख मनाला झालं की
कोपऱ्यात जाऊन रडणारा मी