Mazya Manacha Aavaj Ayikshil Ka
माझ्या मनाचा आवाज जरा ऐकशील का?
हळूच येऊन माझ्यापाशी डोळ्यांनीच काही बोलशील का?
मान्य आहे घाबरतेस तु , पण तरीही
फक्त एक दिवस माझ्यासोबत स्वैर कुठे भटकशील का?
डोळे तुझे इशारे त्यांचे माझ्यावरच रोखशील का?
ओठ तुझे शब्द त्यांचे फक्त मलाच ऐकवशील का?
मान्य आहे प्रेम करतेस तू ,पण तरीही
सर्वांसमोर एकदातरी व्यक्त ते करशील का?