Bhakti Rang – भक्ति रंग Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Mangla Gauri Aarti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

।।। श्री मंगळागौरी आरती ।।

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
जय देवी मंगळागौरी।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।
।जय देवी मंगळागौरी।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
जय देवी मंगळागौरी।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
जय देवी मंगळागौरी।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
जय देवी मंगळागौरी।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
जय देवी मंगळागौरी।

लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
जय देवी मंगळागौरी।

View More

Navratri Aarti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 11
Loading...

।। नवरात्र आरती ।।

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ॥
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥
मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेउनी हो ॥
ब्रह्माविष्णुरुद्र आईचें पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो॥
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
ध्रु०॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ॥
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥
उदो० ॥ २ ॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ॥
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ॥
कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ॥
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥
उदो० ॥ ३ ॥

चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो ॥
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥
उदो० ॥ ४ ॥

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो ॥
अर्थ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ॥
आनंदें प्रेम तेंआलें सद्भावें क्रीडतां हो ॥
उदो० ॥ ५ ॥

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ॥
घेउनि दिवट्या हस्तीं हर्षें गोंधळ घातला हो ॥
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ॥
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥
उदो० ॥ ६ ॥

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायनी हो ॥
सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो ॥
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ॥
स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥
उदो० ॥ ८ ॥

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ॥
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ॥
षड्रस‍अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ॥
आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरुनी हो ॥
उदो० ॥ ९ ॥

दशमीच्या दिवशीं अंबा निघे हो ॥
सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेउनी हो ॥
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ॥
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ॥
उदो० ॥ १० ॥

View More

Durga Mata Chi Aarti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

।। दुर्गा माताची आरती ।।

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

View More

Subscribe

Loading