Navri Che Ukhane
नवरीचे उखाणे
“मेंदी रंगते हाती, वीडा रंगतो ओठी,………. रावांच नाव घेते तुमच्यासाठी”
“आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद , ………चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!”
“…… लेक, झाले ….सुन् ………..चे नाव घेते ग्रुह्प्रवेश करुन्………..”
“……….– रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन”
“अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले, …. सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).”
“अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा ……….–रावांच्या नावावर भरते लग्नचुडा”
“अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी, ….. नी आणलीये सुगंधी वेणी.”
“अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली ……….– रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली”
“अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला अनमोल ग्रंथ गीता , ..चे नाव घेऊन येते मी आता”
“अस्सल सोने चोविस कँरेट ……………….- अन माझे झाले आज मँरेज “
“आंनदाने भरला दिन हा लग्नाचा ……….– रावांना घास देते गोड जिलेबीचा”
“आई वडील सोडताना, पाउल होतात कष्टी …. रावांच्या संसारात करीन मी सुखाची सृष्टी “
“आई, बाबा येते आशीर्वाद दयावा ……….– रावांचा सहवास जन्मभर लाभावा”
“आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस ……….–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस”
“आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा ……….– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा”
“आज आहे श्रावणी पोळा, ….. च्या जीवावर शृंगार केले सोळा.”
“आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी, ….ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी”
“आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण ….. रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकन”
“आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती, ….नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती”
“आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर आयुष्याचा प्रवास करीन ……….– रावांच्या बरोबर”