Navardevache Ukhane – नवरदेवाचे उखाणे
नवरदेवाचे उखाणे
“संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका …..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!! “
“अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!”
“सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप …..मिळाली आहे मला अनुरूप “
“अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा … ला घास घालतो वरण-भात तूपाचा”
“अमुल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सदिच्छा आणि असेच सदैव …………… आणि ……………च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा. “
“आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड …. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड”
“आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर …. च्या आगमनाने पडली त्यात भर”
“आकाशात उडतोय पक्ष्यांचाथवा ……………चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा”
“आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी, ….ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी”
“आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुंजन सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!”
“उगवला रवी, मावळली रजनी … चे नाव सदैव वसे माझ्या मनी”
“उभा होतो मळयात, नजर गेली खळयात नवरत्नांचा हार ……….- च्या गळयात ”
“उमाचा महादेव आणि सितेचा राम … आलि जीवनी आता आयुषयभर आराम ”
“कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध ….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद ”
“काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात ”
“काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून ”
“कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास ….. ला देतो मी लाडवाचा घास”
“कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे, …सह घेतले मी सप्तपदीचे फेरे”
“कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मि देतो …… ला श्रिखंड चा घास”