Vat Purnima Ukhane ( वटपौर्णिमा उखाणे )


Vat Purnima Ukhane
1. पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सडा वटपौर्णिमेच्या दिवशी….
रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा

2. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ….रावांसोबत झाले आताच माझे लग्न

3. वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी

4. देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

5. भरझरी साडी जरतारी खण ….. रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण

6. जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी …… रावांची साथ जन्मोजन्मी असावी

7. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

8. आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला….रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणे मागते देवाला

9. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते, ….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते

10. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, ….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

More Entries

  • Happy Vat Purnima
  • Vat Purnima Shubhechchha
  • Vat Purnima Shubhechchha
  • Vat Purnima Shubhechchha
  • Vat Purnima Sanacha Hardik Shubhechha
  • Vat Paurnimechya Hardik Shubhechchha
  • Pati Sathi Vat Purnima Hardik Shubhechha

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading