Uth Pandharichya Raja Lyrics


“ऊठ पंढरीच्या राजा”

ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला
ऊठ पंढरीच्या राजा, ऊठ पंढरीच्या राजा

पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला
ऊठ पंढरीच्या राजा, ऊठ पंढरीच्या राजा

कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला
ऊठ पंढरीच्या राजा,ऊठ पंढरीच्या राजा, ऊठ पंढरीच्या राजा

पुंडलीक हाका देई, उभ्या राही, रखुमाबाई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊनी हाती सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला
ऊठ पंढरीच्या राजा, ऊठ पंढरीच्या राजा

– ग. दि. माडगूळकर

More Entries

  • Utha Utha Sakal Jan Lyrics
  • Tuj Mangato Mi Aata Lyrics
  • Rama Raghu Nandana Lyrics
  • Prabhati Sur Nabhi Rangati
  • Omkar Swarupa

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading