Utha Sakaljan Uthile Narayan Lyrics


“उठा सकळजन उठिले नारायण”

उठा सकळजन उठिले नारायण ।
आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर ।
मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥

जोडोनिया दोन्ही कर मुख पाहा सादर ।
पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥

तुका ह्मणे काय पढियंते तें मागा ।
आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥४॥

– संत तुकाराम

More Entries

  • Utha Utha Sakal Jan Lyrics
  • Rama Raghu Nandana Lyrics
  • Omkar Swarupa
  • Tuj Mangato Mi Aata Lyrics
  • Prabhati Sur Nabhi Rangati

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading