Smita Haldankar - Wishes, Greetings


Durga Mata Che Sahave Rup Katyayni Mata

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

Katyayni Mata

माँ कात्‍यायनी मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा कात्यायनी यशस्वनीम्॥

कात्‍यायनी :

दुर्गेचे सहावे रुप म्हणजे कात्यायनी. कत नावाच्या ऋषींच्या पु्त्राचे नाव कात्य. कात्य यांच्या पुत्राचे नाव कात्यायनऋषी. कात्यायन ऋषींनी भगवतीची कठोर तपस्या केली. कठीण उपासनेमुळे प्रसन्न होउन, कात्यायन ऋषींच्या ईच्छेप्रमाणे, भगवतीने त्यांच्या घरी जन्म घेतला. त्यामुळे या देवीला कात्यायनी असे म्हणतात. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या
हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.

Durga Mata Che Pachve Rup Skand Mata

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

Skand Mata

माँ स्कन्दमाता मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ॥

स्‍कंदमाता :

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. माता पार्वतीचे प्रथम पुत्र कार्तिकेय चे नाव स्कंद आहे, म्हणूनच स्कंद ची माता स्कंदमाता. या रुपात या देवीने आपल्या पुत्राला म्हणजेच स्कंदला स्वत:च्या मांडीवर घेतलेले आहे. देवीला चार भुजा असून डाव्या बाजूच्या एका भुजेने स्कंदला मांडीवर पकडून ठेवलेले आहे तर दुस-या भुजेत कमळाचे फुल आहे. तसेच उजव्या बाजूच्या एका भुजेने वरमुद्रा दाखवली आहे तर दुस-या भुजेत देखील कमळाचे फुल आहे. देवीचे वाहन सिंह आहे.

Subscribe

Loading