Shubh Sakal Shri Ganeshay Namah

शुभ सकाळ ॐ श्री गणेशाय नमः
जर देवाने आपले नशीब लिहिले असते तर
ते सर्वात चांगले भाग्य ठरले असते.
आपले भाग्य आपल्या कर्माद्वारे,
आपल्या स्वेच्छेने तयार केले जाते.

शुभ सकाळ
श्री राम जय राम जय जय राम
श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
जय श्री शनिदेव
“ॐ भगभवाय विद्महे मृत्युरुपाय,
धीमहि तन्नो शनि प्रचोदयात्!!”
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्.

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
पानोपानी अमृत शिंपित
उषा हासरी हसते धुंदित
जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती
कृषीवलांची हाक ऐकुनी
मोट धावते शेतांमधुनी
पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळविती
प्रसन्न वदनी सुहासिनी कुणि
सडे शिंपिती मृदुल करांनी
श्रीविष्णूचे नाम स्मरूनी तार कुणी छेडिती
– रमेश अणावकर

Omkar Swarupa
“ॐकार स्वरूपा”
ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रह्म ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
– संत एकनाथ

Ghanshyam Sundara
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी
कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
– शाहीर होनाजी बाळा