Prem Marathi Charoli Images – प्रेम मराठी चारोळी
भावना समजायला
शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते.
वाटलं होतं मला
असं काहीतरी घडेल
कविता माझ्या वाचून
कोणीतरी प्रेमात पडेल
तुझ हसणं तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही..
तुला पाहिलं की
अस काय होवून जात,
माझ मन मला
कस विसरून जात.
ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?
मी सांगत नाही तुला ,
भरभरुन प्रेम दे…
पण जेवढं देशील ,
ते ह्रदयातून येऊ दे…
डोळे तुझे कातील ,
ह्रदयावर वार करतात….
ह्रदयातील प्रेमाची अलगद ,
तार छेडतात….
पाहून तुला तो, चंद्रही फसेल…
चांदणी समजून, पाहत तुलाच बसेल..
मिठीत जेव्हा तुला हळूच माझ्या घेतले…
खरं सांग तू तेव्हा कितीसे तुझ्यात उरले…
मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा…
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा..
उभा मी शांत आज ,
तूझ्याकडे पाहतं…
समोर माझ्या एक फुल ,
नुकतच होतं फुलतं…