Maitri Marathi Charoli Images – मैत्री मराठी चारोळी


Maitri Mahnje…

मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं
मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं.

चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की, औषधांना
असते ‘एक्सपायरी डेट’
पण मैत्रीला नाही!!!

मैत्री असावी मनामनाची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी
फक्त तुझी आणि माझी

आपली चूक कबुल करुन
मनात राग न धरता
परत पहिल्यासारखीच राहते
ती म्हणजे तुझी माझी मैत्री!

मैत्रीचं नातं नाजूक
फुलासारखं अलगद फुलणारं
आणि
एकदा फुलून झालं की, जन्मभर
गंध देत झुलणारं!!

बालपणातील मैत्री म्हणजे
एक खुणेची जागा
गाभुळलेल्या आठवणी विणणारा
एक नाजूक धागा!

किती सुंदर होते ते लहानपणाचे दिवस
दोन बोट जोडली की, दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची
मोठे होता होता सरलं सारं बालपण
मैत्री आपली अशीच राहील
आज, उद्या आणि कायम

अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे ‘मैत्री’

Maitri Mahnje Sunder Pahat

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण
आणि मनातून मिळालेलं खरखुरं शहाणपण

आयुष्यात लाखो मित्र आले आणि गेले
पण बालपणातील त्या मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
कारण ते दिवसच खास होते

मैत्री खास लोकांसोबत होणे महत्वाचे नसते
ज्याच्याबरोबर होते ते नातं खास होणं महत्वाचे असते

कोणीतरी एकदा विचारलं, मैत्री कशी असावी
मी म्हणालो, आरशासारखा प्रामाणिक आणि गुणदोष दाखविणारी

तुझी सोबत, तुझी संगत
आयुष्यभर असावी..
नाही विसरणार मैत्री तुझी,
तू फक्त शेवटपर्यंत निभवावी

तुझी आणि माझी मैत्री अशी असावी
काटा तुला लागला तर कळ मला यावी…

चांगल्या मैत्रीची
साथ मिळायला भाग्य लागतं
आणि ती साथ कायम स्वरुपी टिकून राहण्यासाठी
मन साफ लागतं

Parichayatun Julate Ti Maitri

परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री.

मित्र नेहमी अलंकाराप्रमाणे सौंदर्या वाढवणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र दैवानेच लाभतात
– व. पु, काळे

मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात
काही जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर ‘मैत्री’ म्हणतात

कितीही भांडणं झाली तरीही
खऱ्या मैत्रीला पुन्हा एकदा एकत्र येण्याची घाई असते
कारण विरहाची नशा अनुभवायची दोघांनाही अनुभवण्याची इच्छा नसते!

मैत्री ही एका
फुलाप्रमाणे असते
ती फुलवावी तशी फुलते
पण त्या फुलाच्या पाकळ्या
गळू न देणे आपल्या
हातात असते

मैत्री करण्यासाठी वयाची अट नसते
फक्त विचार जुळले पाहिजेत
एकमेकांचे मैत्रीचे नाते हे आपोआप जुळते

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

Tuzya Mazya Maitrit Kay Gupit Laplay

‘तुझ्या माझ्या’ “मैत्रीत” काय “गुपित” लपलंय
तुझ्या माझ्या “मैत्रीने” फक्त आपलेपण जपलंय
“नात्यांचे” स्नेह बंध कोण शोधत बसलंय
“जीवा” पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय..

सागराचे पाणी कधीच आटणार नाही
मनातील तुझी आठवण कधीच मिटणार नाही
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही

मैत्रीचे समीकरण जुळले की
कधीच होत नाही वजा
कितीही भांडण झाली
तर मनातून मैत्री नाही होत नाही वजा

तुझ्या मैत्रीची इतकीच खात्री असते
तुझी ओंजळभर सोबतच मला
आभाळभर वाटते!

श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
काळजाला काळजाची आस असते मैत्री
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री!

आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं
सुखं दु:खाच्या क्षणी मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते मैत्री!

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसू नकोस,
मला कधीच विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा,
कोणाला देऊ नकोस!

मैत्रीच्या वाटेवरील प्रवास असात अखंड राहू दे
जगायला सुरुवात करा मित्रांनो आनंदाचा पूर वाहू देत
अडचणीच्या वाटेवर उभा सदैव राहीन
दु:खात असणाऱ्या माझ्या मित्राला सुर्योदयाकडे नेईन

Mitra Mahnje Ek Zad

मित्र म्हणजे एक झाड वळणावर वाढणारं,
आपली सावली होण्यासाठी उन्हासोबत लढणार.

बालपणीची ती श्रीमंती
कुणास ठाऊक कुठे हरवली
कधी काळी पावसाच्या पाण्यात
मित्रांसोबत आम्ही जहाजं चालवली!

मैत्री एक सोपी व्याख्या आहे,
रोज आठवण यावी असे काही नाही,
रोज भेट व्हावी असे काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी असे काही नाही,
पण मी तुम्हाला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव करुन देणं झाली ‘मैत्री’

मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री एक विश्वासाचे दुसरे नाव आहे,
बाकिच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे
मैत्री…

नको फुलासारखी, शंभर सुखं देणारी..,
नको सूर्यासारखी, सतत तापलेली
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी..,
नको सावलीसारखी, कायम पाठलाग करणारी..,
मैत्री..हवी अश्रूसारखी, सुख दु:खात समान साथ देणारी

एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा फायदा काय आहे
कृष्ण हसून म्हणाला,
जिथे फायदा असतो
तिथे ‘मैत्री’ कधीच नसते

तुझ्याशी मैत्री करुन
रंगले माझे जीवन
मित्र आहोत तुमचे
तुम्ही फक्त शब्द टाका
तुमच्यासाठी कायपण

मैत्रीत भांडणं असावीत
पण भेदभाव नको,
मैत्रीत साधेपणा असावा, मोठेपणा नको,
मैत्रीत प्रेम असावा, EGO नको,
मैत्रीत PROMISE असावे पण अटी नको
मैत्रीत आनंद असावा पण राग नको…

Kagda Chi Nav Hoti…Maitri Charoli

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.

मैत्रीच्या गाण्याचे शब्द असतात खूप भाऊक
आणि स्वरांनासुद्धा मैत्री सोडून काहीच नसतं ठाऊक.

थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते
तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्राने बांधले होते

आयुष्याचा अर्थ मला
तुझ्या मैत्रीने शिकवला
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी
जगण्याचे संदर्भ वेगळे होते
तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ
बदलत गेले

जे प्रत्येक क्षणाला पुढे
जाते ते ‘आयुष्य’
जो प्रत्येक क्षणाला जळत
राहतो तो ‘प्रकाश’
जे प्रत्येक क्षणाला फुलत
राहते ते ‘प्रेम’
जी प्रत्येक क्षण
साथ देते ती ‘मैत्री’

मैत्रीचं नातं जगावेगळं असतं
रक्ताचं नसलं तरी ते मोलाचं असतं

तुझ्याशी मैत्री
म्हणजे वेगळीच बात आहे,
कारण
सुख दु:खात
आपल्या दोघांची साथ आहे

Maitri Aso Va Naso Charoli

छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते.
मैञि असो वा नसो,
भावना शुध्द असाव्या लागता.

मैत्रीचा हा धागा रेश्मापेक्षाही असतो मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सुप्त भूक!

‘मित्र’ म्हणजे
एक आधार
एक विश्वास
एक आपुलकी
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तुझ्या रुपाने

मैत्री म्हणजे तुझं मन
आपोआप मला कळणं
मैत्री म्हणजे माझ्या मनाचं
नातं तुझ्याशी जुळणं

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतुट सोबत आयुष्याची

मी रुसावे, अन् तू मला हसवावे
तू रुसावे, अन् मी तुला हसवावे
असे आपले नाते चिरंतर असावे

Tuzi Mazi Maitri Marathi Status

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

तुझं मन, माझं मन
एकमेकांशी जुळू दे
मैत्री नवं नातं
मनी आपल्या रुळू दे.
तुझ्या मनाला माझ्या
मनाचा रस्ता छान कळू दे
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही
ओंजळ पूर्ण भरु दे!

तुझी माझी मैत्री
सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं
मनातलं,
उत्सफूर्त असं वाचन आहे!

प्रेमाला प्रेम समजणारी
ती मैत्री असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी असावी

मैत्री नावाच्या नात्याची
वेगळीच असते
जाणीव,
भरुन काढते
आयुष्यात,
प्रत्येक नात्याची उणीव!

मैत्री म्हणजे सुखामध्ये
समोरच्याला हात देणं
मैत्रीमध्ये दु:खामध्ये
समोरच्याचा हात होणं

Maitri Cha Dhaga Charoli

मैत्रीचा हा धागा
रेश्मापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक।

सर्वश्रेष्ठ असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते ह्रदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात!

परिचयातून जुळते ती मैत्री
विश्वासाने जपते ती मैत्री
सुखात साथ मागते ती मैत्री
आणि दु:खात साथ देते ती मैत्री!

ना कसले बंधन
ना कसली वचनं
मैत्री म्हणजे खरंतरं
मनाने जवळ असणं

मैत्री म्हणजे
आपल्या विचारात
सतत कुणी येणं असतं
मैत्री म्हणजे,
न मागता
समोरच्याला भरभरुन देणं असतं!

Maitri Mahnje Suvichar

“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’असतो.
‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो.
“मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…

मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी
निर्मळ करा
दूरवर जाऊनही
क्षणोक्षणी आठवेल अशी करा

मैत्री असावी अशी,
जन्मोजन्मीची साथ देणारी
सदैव मदतीचा हात देणारी
अन्, संकटांना सोबतीने मात देणारी

जिथे स्वार्थाच्या उग्रतेचा गंध नसतो
जिथे मनाचा कलुषित रंग नसतो
जिथे एकमेकांचा अतुट बंध असतो
आणि,
ज्या नात्याला कोणताही अंत नसतो
ते नाते म्हणजे ‘मैत्री’

प्रेम आणि मैत्री यात
मैत्री श्रेष्ठ
कारण प्रियकर-प्रेयसीपेक्षा मित्रच बेस्ट

मैत्रीत नसते कसलीही रिती
मैत्री म्हणजे निखळ प्रीती
मैत्रीत दाटतो एकच भाव,
मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव
मैत्रीत असते फक्त प्रेमाचीच शिंपण,
खरंतरं मैत्री म्हणजे दोन जिवांची नाजूक गुंफण

Jiva Bhavache Mitr Khup Sare Jamav

More Entries

  • Maitri Cha Dhaga Charoli
  • Maitri Aso Va Naso Charoli
  • Kagda Chi Nav Hoti…Maitri Charoli
  • Shabdanchi Sath
  • Tuzi Mazi Maitri Marathi Status
  • Beautiful Pavus Charoli

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading