Jivan Marathi Charoli Images – जीवन मराठी चारोळी
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात…..
केव्हा संपेल जीवन
कुणालाच समजत नाही
मनासारखं जगून घ्यावं
कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही.
जीवनाचा प्रवास
स्वतःच करायचा असतो
कुणीतरी सदैव सोबत असावं
असा हट्टसुद्धा धरायचा नसतो.
जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात..
न कळणाऱ्या जीवनात
थोडं सांभाळून चालावं
सरळ रस्त्यावर वेगाने तर
वळणावर पाऊल जपून टाकावं.
जीवनात सदैव
आनंदी राहायचं असतं
कारण दुःखाचं गाठोडं इथं
प्रत्येकाच्या नशिबात असतं.
जे घडतं त्यातून आपल्याला
एक मार्ग मिळतो,
मिळालेला मार्ग आपल्याला
जीवनाची दिशा दाखवतो.
कुणी, आपल्यावर कोणाचा
भरवसा नाही म्हणून रडतो
तर कुणी, आपण इतरांवर
भरवसा ठेवला म्हणून रडतो.
जीवनाच्या प्रवासात
अनेक लोकं भेटतात
साथ देणारे कमी अन
सोडून जाणारेच जास्त असतात.
जीवनाचा प्रत्येक क्षण
आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपणे आपल्या
आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो
जीवनात सारेच स्वार्थात
बुडालेले स्वार्थी असतात,
ते का? माणूसकीची निस्वार्थी
जाण विसरलेले असतात.
प्रत्येकाने आयुष्यात
खूप व्यस्त असावं,
जे पैश्याने नाही मिळणार
ते कमवून बघावं.
आयुष्य फक्त
जिंकण्यासाठी नसतं
कधी हरण्यासाठी
तर कधी शिकण्यासाठी असतं.
ळ जीवनात
सर्वकाही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते.