Pavus Marathi Charoli Images – पाऊस मराठी चारोळी
आवडतं मला पावसात
चिंब चिंब भिजणं
अनुभवते मी बीजाचं
अंकुरण्यासाठी रुजणं…
पावसाचे आघात झेलूनच
माती बनते सुगंधी,
तिचा गोडवा पसरताच
वातावरण होते आनंदी।
मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा।
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….
“भाव अत्तराचे आज पार कोसळले …
थेंब 🌧पावसाचे जेव्हा मातीत मिसळले…”
………☔
मिजास अत्तरांची
क्षणात विरून गेली….
पहिलीच सर जेव्हा,
मातीत जिरून गेली……☂
💦…पहिल्या पावसाच्या शुभेच्छा…💦
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले..
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..
तू आणि पाऊस,
असेच अवेळी येता,
नको नको म्हणता,
चिंब चिंब करून जाता.
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो…