पाणी धावतं, म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे, जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची, आनंदाची वाट सापडते.
Tags: Smita Haldankar
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण, “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.
प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार , आणि निभावलं तर जीवन.
“चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही, अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.