Marathi Bhasha Slogans (मराठी भाषा घोषवाक्य)
मराठी भाषा घोषवाक्य
माझी मराठी माझी मराठी,
सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
आपणच आपल्या उद्धारासाठी
चला बोलूया मराठी मराठी.
मराठी चे आद्यदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव.
माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी .
साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
माझ्या मराठी ची बोलू कौतुके,
गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके.
अभंगांचा रचुनी पाया,
संतानी घडवली मराठी ची काया.
काना-मात्रा वेलांटीनी नटली मराठी,
व्याकरणशुद्ध बोलून लेवूया ललाटी.
मराठी हि असे आमुची राजभाषा,
सरकारी दरबारी घोळवी हीच मनीषा.
आपणच आपणासी तारी,
मराठीची किमिया न्यारी.
साहित्याचा वारसा चालवूया गडे,
मराठी पाऊल पडते पुढे.
उखाणा घेण्याची गम्मत खरी,
मराठी भाषेशी न करावी कोणी बरोबरी.
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी,
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका!
जिच्यासाठी केला होता अट्टहास,
थांबवा आता आपण मराठीचा ऱ्हास.
बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…