Food Slogans (खाद्य पदार्थ घोषवाक्य)


खाद्य पदार्थ घोषवाक्य

पपई, गाजर खाऊ स्वस्त, डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

सोयाबिन ज्यांचे घरी, प्रथिने तेथे वास करी.

भाज्या जास्त वेळ शिजवू नका, जीवनसत्वांचा नाश करु नका.

जो घईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.

भाजीपाल्याचं एकच महत्व, स्वसत मिळेल भरपूर सत्व.

शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग, लोणी, दूध तुपवानी, सत्व तिच्या संग.

कळणा कोंडा खावी नाचणी, मजबूत हाडे कांबी वाणी.

सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त.

डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप.

खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे.

तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त, आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री

पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड.

पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी.

भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका.

भोजनोत्तर फळांचा ग्रास; थांबवेल आरोग्याचा ह्रास.

रोज एक फळ खावू या; आरोगयाचे संवर्धन करु या.

प्रथिने, जीवनसत्वे, क्षार; यांचे आहारात महत्व फार.

हिरवा भाजीपाला खावा रोज; राहील निरोगी आरोग्याची मौज.

जेवणा नंतर केळी खा; पाचनशक्तीला वाव द्या.

खावी रोज रसरशीत फळे; सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.

गालावर खेळते सदा हास्य, फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.

साखर व तूप यांचे अति सेवन करु नका

मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.

More Entries

  • Paryavaran Ghoshvakya
  • Jagtik Polio Diwas Slogan
  • लोकसंख्या घोषवाक्य
  • Save Earth Ghoshvakya
  • Slogans On Corruption In Marathi
  • Tambakhu Nishedh Ghoshvakya
  • Marathi Bhasha Ghoshvakya

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading