Diwali Wishes Images ( दिवाळी शुभेच्छा इमेजेस )
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
दिवाळी साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Diwali Photo Frames
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दिवाळी.
दिपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
लक्ष्मीच्या सोनपावलांनी आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येवो.
अंधकार दूर करून सर्वांचे आयुष्य आपल्या तेजाने
उजळून टाकणाऱ्या दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष आरोग्यदायी शुभेच्छा.
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल
आत्म जाणिवेची ज्योत लावून
आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक
Comments are closed.