“ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली
Tags: Smita Haldankar
“अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना घरचा पाहुणा उठेना जिभेचा फोड फुटला घराचा पाहुणा उठला !!”
“आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू.
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान.
चाउ माउ चाउ माउ पितळीतले पाणी पिउ हंडा पाणी गडप.”
“गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण
गोर्यागोर्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण ! वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
“उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही !
“झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया