Vat Purnima Manache Dhage Julele Asel Tar
स्वतःची नाश्त्याची प्लेट लावताना,..
तो म्हणाला
तुला उपवास असेल ना
वटपौर्णिमेचा,..?
ती हसत म्हणाली,..
तू केलास तरी चालेल,..
छे बायकांचा सण आहे,
आमचं काय त्यात??
अरे पण ध्येय तर तुम्हीच ना,.
तो म्हणाला,..
पण तुला पटतं,..
हे सात जन्म बुकिंग
आणि त्या दोऱ्याने
कन्फर्मेशन होतं असं वाटतं?
माहीत नाही रे
पण एक पॉझिटिव्ह एनर्जी
भावनेला अध्यात्माची किनार,..
नकळत 7 जन्माचा
एक पॉझिटिव्ह व्ह्यू,..
आणि थोडक्यात
सगुण निर्गुण भक्तीसारखं
वाटत मला हे व्रत….
वड, दोरा, आंबे
हळदी, कुंकू,..
वस्त्रमाळ,..
आणि नटलेली ती किंवा
हे सगळं नसतानाही ,..
धावपळीत ऑफिसला जाताना
त्याला मिठी मारून
*Take care* म्हणून
जाणारी ती
शेवटी भाव तर एकच
ध्येय तर नवरेच,..
फक्त धागे मनाचे रहावेत
गुंतलेले,..
मग ते तिने मारलेलेच
असावे हा अट्टहास नको
दोघांच्या मनाचे धागे
जुळलेले असले तर
सात जन्माचं
कुणी पाहिलंय…
पण हा जन्म तर
नक्कीच सुखात जाईल…
#🙏 वटपौर्णिमा