शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Bail Pola Quote Pic
आज बैलाले खुराक, रांधा पुरणाच्या पोया.. खाऊद्या रे पोटभरी, होऊ द्या रे मंगदुल.. बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।। किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।। तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।। एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।। बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!