Man Hot Maz Kuthetari Haravlela

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.
तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.
तिच्या हाताचा, ओढणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.
हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.
ती आली की
वेळही उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं…

चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
शुभ सकाळ मित्रानो!!!!!
🌹❤🌹🌹❤🌹❤🌹
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल
तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल……!