Sad Shayari In Marathi – दुःखी शायरी


Dard Shayari - दर्द शायरी

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.

जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले

जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा

जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला
कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा
फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा
जुळवून जा.

कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा …
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

“शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..”

Dard Shayari

जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा

नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा

हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते.
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते ,
जीवन एक रंग मंच आहे .
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सागंना…
अन् तुझ्यासाठी मन माझं झुरतं,
एकदा तरी तु भावना जाणना….”

More Entries

  • Prernatmak Shayari
  • Yevun Mitthit Aaj Mahnali
  • Denaryane Det Jave Ghenaryane Ghet Jave
  • Motivational Marathi Shayari
  • Agnyana Cha Andhkar Shayari
  • Yevun Mitthit Aaj Mahnali

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading