Friendship Shayari In Marathi – मैत्री शायरी


निशब्द भावनेला स्पर्शाची साथ
हळव्या मनाला आसवांची साथ
उधाण आनंदाला हास्याची साथ
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात..

मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्री विना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात जीवन सुगंधी करायचे.

मैत्री असावी मनामनाची
मैत्री असावी जन्मोजान्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी

मैत्री म्हंटली कीआठवतं ते बालपणं आणि
मैत्रीतून मिळालेलं तेखरंखुरं शहाणपण.

मैत्री म्हणजे शब्दाशिवाय
एकमेकांच मन जाणुन घेण,
चुकल तर ओरङणं,
कौतुकाची थाप देणं,
ऐकमेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतुट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास
सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट….

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी.

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची .!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

Maitri Shayari

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची

“मैत्री”अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ, काही खरखरीत..
काही काळी, काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई..
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी…

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली…

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.

 Maitri

श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी…

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.,
गवत झुलते वा-याच्या झोतावर .
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते

एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे…
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे…
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजेल ..!

Friendship marathi shayari

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री …फ़क्त मैत्री……

मैत्री नको चंद्रा सारखी दिवसा साथ न देणारी.
नको सावल्या सारखी कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात साथ देणारी

आहेस तू सावरायला म्हणून पडायला आवडत.
आहेस तू हसवायला म्हणून रडायला आवडत.
आहेस तू मनवायला
म्हणून रुसायला आवडत.

Friendship marathi shayari

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील.

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री फ़क्त मैत्री……

छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता

More Entries

  • Prernatmak Shayari
  • Yevun Mitthit Aaj Mahnali
  • Denaryane Det Jave Ghenaryane Ghet Jave
  • Dard Shayari - दर्द शायरी
  • Motivational Marathi Shayari
  • Agnyana Cha Andhkar Shayari
  • Yevun Mitthit Aaj Mahnali

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading