Love Shayari In Marathi – प्रेम शायरी


Yevun Mitthit Aaj Mahnali

येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही.

तुझे हसणे इतके सुंदर की,
गुलाबही बघत बसते…
तू समोर असलीस की,
तेही उमलायचे विसरते…

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त
आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते
जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर
टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..

भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आज त्रुप्त होणार ,
तुझ्या माझ्या भेटीला आज मुहुर्त सापडणार ,
वाटते जराशी भिती तरी माझ्या समोर तु असणार ,
आज सगळ्या जगाला विसरुन फक्त तुलाच पाहणार.

प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…

Prem Shayari

हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे .

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी, माझी एक छानशी चारोळी असावी

Prem Shayari

आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन ,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच…
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच…
जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी…
आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच..

Prem Shayari

तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही

Prem Shayari

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

प्रेम करतो तुझ्यावर…
सोडून मला जाऊ नकोस…
खुप स्वप्न बघितलित…..
तोडून कधी जाऊ नकोस….

हाती मिळाली अधुरी कहाणी ,
स्वप्नात तोलत होतो तुला माझी बावरी …
शांत जरी नाही राहिलीस तू माझी वेडी ,
तरी कवचात ठेवणार तुला हे काळीज बोली …

More Entries

  • Prernatmak Shayari
  • Denaryane Det Jave Ghenaryane Ghet Jave
  • Dard Shayari - दर्द शायरी
  • Motivational Marathi Shayari
  • Agnyana Cha Andhkar Shayari
  • Yevun Mitthit Aaj Mahnali

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading