Rikshawala Aani Gampu Cha Joke
“रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू – नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार.
सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
… गंपू – आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!”