Ram Navami – राम नवमी Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Ram Navami San Chi Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

रामनवमी सणाची माहिती

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे.
या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला.
हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.
त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.
श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

View More

Subscribe

Loading