Shree Ram Navami Greeting Image
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन. श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
View Moreरामनवमी
चैत्र शुद्ध नवमी हा श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून या तिथीस रामनवमी म्हणतात. हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२. ०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास किंवा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळी जवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.
तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वाहतांना आधी हळद आणि नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली आणि जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्या केल्या जाणार्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
Ram Navami साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ram Navami Photo Frames