Mazya Swapnatil Ti…


माझ्या स्वप्नातील ती

ति तुच होतीस का गं?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं होय तिच तु…
माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु… माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी, तु…
आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी “गोंडसपरी” बोल होशील माझी माझी ?
अर्धांगी?? लावशील कुंकु माझ्या नावाचं?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन?
बस… अन मी तुझाच…
प्रत्येक जन्मासाठी….
सप्तपदीची सात पाऊले वचने देखील
सात संकटे सारी जातील विरुन जर
हातात असेल तुझा हात.

More Entries

  • Mazi Ti Ashi Asavi
  • Mazya Manacha Aavaj Ayikshil Ka

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading