Yeshil Ka Ga Kadhi…


येशील का गं कधी

येशील का गं कधी तू माझ्यापाशी
हवेची झुळूक बनून
डोलावाशील ना मान तुझी
गवताचं पातं बनून ?
विसरू दे मला जग सारं
विसरू दे माझं भान सारं
तुझ्या डोळ्यांच्या तिरक्या नजरेत वाहून जाताना
शब्दात प्रत्येक तुझ्या मला पाहताना दुखं जातात
दूर पळून, जेव्हा मनमोकळं हसणं तुझं
जखमांवर माझ्या फुंकर घालतं
प्रेमाची लहर येते दाटून
तुझ्याबरोबर दुरवर क्षितिजं पाहताना ….

More Entries

  • Mazya Manacha Aavaj Ayikshil Ka

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading