
सच्चे मित्र जपा
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसले होते. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मैत्रीणींना टाळत होते, भेटी कमी झाल्या होत्या. नवर्या सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता…..
पन्हे पितांना वडील म्हणाले, अग मी सांगतो म्हणून ऐक, पण मैत्रीणींना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल…
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही अडल्ट होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण खऱ्या मैत्रीणी बदलल्या नाहीत. राजश्रीची राजीच राहिली, शोभेची शोभा झाली नाही, पल्लवीला पल्ली बोल्ल्याशिवाय करमत नै, मानसीला पूर्ण नावाने कधी आवाज दिला नै मनीच बरं आपलं, रेखा म्हणजेच रेखी आपली.. बेबी आकाराने विशाल झाली पण आमच्यासाठी छोटीशी बेबीच राहिली,
आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मेडल पोडीयमवर आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना ” अबे तू पागल है ” हे सांगायला कोणतेही दडपण नसते.
😊