Sansarat Yogy Veli Yogy Shabdachi Funkar Marayla Havi“तू नाष्ट्याला काय खाणार आहेस आज … ?”

नेहमीच्या ठसक्यात तिने रोजचा सवाल केला ..

“काहीही कर …”

दात घासता घासता त्याने अर्धवट बोबड्या आवाजात उत्तर दिलं .. नेहमीसारखंच ..

“पोहे … ?”

त्याने नाक मुरडलं …

“उपमा .. ?”

त्याने उगाचच खाकरत विरोध नोंदवला …

“थालीपीठ .. ?”

“ए .. बरं काहीतरी कर ना …”असं म्हणत त्याने टॉवेलला तोंड पुसलं ..

चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला झाला तेव्हा ती त्याच्यासमोर उभी होती ..
रखुमाई बनून .. !अर्थात कमरेवर हात ..

“तुला काहीच कसं चालत नाही रे .. ? रोज रोज फाईव्ह स्टार पदार्थ आणायचे कुठून …”

तो काहीसा डिफेन्सिव्ह …
“तसं नाही .. काहीतरी वेगळं हवं इतकंच …”

आणि तिचा आवाज अजूनच चढला …
“वेगळं म्हणजे काय .. ? मला नाही कळत … तू सांग .. मी खायला करून घालते ..”

मग बराच वेळ त्याला ही काही सुचलं नाही ..
पण तो कुरबुरत राहिला .. सकाळचं खाणं बेश्ट पाहिजे ..
अख्ख्या दिवसाचा मूड ठरतो त्यावर …

आणि तिकडे तिचा पारा चढलेला …
पट्टा सुरु … सकाळची धावपळीची वेळ …
पिंकू ची शाळा … बाईची गडबड .. केरवारे … लादी .. भांडी ..
आणि त्यात ह्याचे खाण्यापिण्याचे चोचले …
पटकन खायचं .. मोकळं व्हायचं .. ते नाही ..
अंत पाहतो अगदी …

आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ..
पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली ..

“मटकी आहे … मिसळ करू … ?”

तो एव्हाना किचनच्या दारात आलेला …
डोळ्यात चमक …

“चालेल … पण तिखट कर हां…”

तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं …

“हो, मीच शिरते आता त्याच्या आत …म्हणजे होईल झणझणीत!”

तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला … “अगं .. गोड होईल मग ती ..!”

आता तिचा हात थांबला .. तिने त्याच्याकडे पाहिलं ..
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला ,..
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली …

तात्पर्य काय …
संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी …
म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..
(नवरा बायको दोघांनाही लागू ..)

More Entries

  • Yogy Lokana Bhetun Mislyawar Aapan Adhik Changle Hoto

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading