😄 नव्या म्हणी 😄 1)अभ्यासात कमी, काँपीची हमी !
2)घरात माणसे चार, काम वाल्या फार !
Tags: Smita Haldankar
“अर्धी दान महापुण्य “ अर्थ – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
“अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीने मारलेला वर पाही” अर्थ – सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धट पणाने तो आपला शत्रू बनतो.
“अळीमिळी गुपचिळी” अर्थ – आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प राहणे
“अडली गाय फटके खाय” अर्थ – एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे
“अग अग म्हशी मला कुठे नेशी” अर्थ – स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे