Birthday Wishes For Mother In Marathi

Birthday Wishes For Mother In Marathi
आई म्हणजे आनंदाचा झरा, आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस, तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!
जन्मापासून जर प्रत्येक माणसाच्या जवळची व्यक्ती कोणी असेल तर ती म्हणजे आई. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हणतात ते उगीच नाही. अशाच तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी अर्थात आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यासाठी वेगळं असं काय लिहू आई, तू माझं जग आहेस आणि माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा! Happy Birthday Aai
आई, आज तुझा वाढदिवस, आमच्या सर्वांसाठी खास दिवस, तुला जगातली सर्व सुख मिळो आणि यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुला काय हवं असा प्रश्न विचारला तरीही तुझं सुख इतकं उत्तर देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आई आज तुझा वाढदिवस, आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस
तुझा जन्म झाला म्हणून आम्ही जन्मलो, धन्य झालो
आयुष्यात कोणीही आले तरी तुझी
जागा कोणी घेऊ शकत नाही,
तुझ्याशिवाय माझा एक दिवस
जाऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wish For Mother In Marathi
तुला नेहमी चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेनच इतकंच वचन आजच्या दिवशी तुला देऊन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आई!
तुला नेहमी चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेनच इतकंच वचन आजच्या दिवशी तुला देऊन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आई!
आमच्या आवडीनिवडी स्वतःच्या मानणारी आणि आमच्याच सुखात कायम सुख मानणारी अशी व्यक्ती म्हणजे आई तू आहेस, आजच्या तुझ्या या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!
कितीही रागावले तरीही जवळ घेतेस तू मला, रूसवा घालविण्याची कलाच अवगत आहे तुला, कायम केल्या पूर्ण माझ्या इच्छा, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन
तुला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या शुभेच्छा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन याव्यात
हीच इश्वरचरणी प्रार्थना, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Marathi Wishes For Mother
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई असते प्रेमाचे निर्मळ रुप,
तुझ्या असण्यानेच आयुष्याला मिळतो हुरुप
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Marathi Wish Image For Mother
निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा!
Happy Birthday Aai
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी

Birthday Marathi Wish For Mother
तू शतायुषी, दीर्षायुषी व्हावीस आणि तुझ्या आयुष्यात कायम सुखच पाझरावे हीच सदिच्छा, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!