“या बालांनो या रे या ! लवकर भरभर सारे या !
मजा करा रे मजा करा ! आज दिवस तुमचा समजा.
Tags: Smita Haldankar
“छम् छम् छम्….. छम् छम् छम् छडी लागे छमछम विद्या येई घमघम छम् छम् छम्….. छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम छम् छम् छम्
“सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
“चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी.
कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…