Teacher’s Day Messages In Marathi
पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान…
आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि
मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव
माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील.
हॅपी टीचर्स डे.
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे.
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही,
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही.
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही.
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही.
जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही.
आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही.
हॅपी टीचर्स डे.
गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…
गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…
तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.
शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा अंधकार केला दूर…
गुरूने शिकवलं आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.
गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.
तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो.
आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे.
तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात.
देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार.
माझ्या मुलाचे पालक आणि चांगले मार्गदर्शक बनण्यासाठी खूप आभार.
टीचर्स डेच्या शुभेच्छा
तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं,
तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं,
तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.
दिल ज्ञानाचं आम्हाला भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
आहोत आभारी त्या गुरूंचे
ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार
शिक्षक दिन शुभेच्छा
तुम्ही आहात आमच्या जीवनाची प्रेरणा
दिलीत आमच्या करिअरला नवी दिशा
अशा आमच्या सर्व टीचर्सना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
असं घडवलंत तुम्ही की,
आज प्राप्त करू शकतो लक्ष्य
दिलात आम्हाला आधार तुम्ही
जेव्हा वाटलं होतं काहीच नाही शक्य
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
बाई तुम्ही आजही आठवता आम्हाला
एकीकडे छडी मारलीत तरी
दुसरीकडे डोळ्यात तुमच्या असायची काळजी
अशा आमच्या बाई होत्या ज्यांनी आम्हाला घडवलं
बाई तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
सर वर्गात येताच वाटायचा आदर
आजही ते दिसताच त्यांची भेट घेतोच
असे आमचे आवडते शाळेतले ……. सर
सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा