Smita Haldankar - Wishes, Greetings


Besan Che Ladu Receipe

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

2. बेसनचे लाडू

साहित्य
– १ १/२ कप बेसन बेसनचे लाडू
– ३/४ कप तूप
– ३/४ कप पिठी साखर
– १/२ चमचा वेलचीपूड
– बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे
पद्धत
– तूपामध्ये बेसन मध्यम आचेवर
खमंग भाजून घ्यावे
(साधारण ३५ ते ४० मिनीटे).
– भाजताना सारखे ढवळत राहावे.
तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि
साधारण १० मिनीटांत पातळ व्हायला लागेल.
– बेसन बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा.
– बेसन पूर्ण गार होवू द्यावे. नंतर त्यात गरजेनुसार साखर घालावी. निट मिक्स करून घ्यावी.
– साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलचीपूड घालून लाडू वळावेत.
– कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.

Dinka Che Ladu Receipe

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

1. डिंकाचे लाडू

साहित्य
– १/४ किलो डिंक
– १/४ किलो सुके खोबरे
– १/४ किलो खारीक
– ५० ग्राम बदाम बेदाणे
– १०० ग्राम खसखस
– १ चमचा सुंठपूड
– ६-७ वेलच्या
– थोडी जायफळ पूड
– थोडी जायफळ पाउडर
– १/४ किलो तूप
पद्धत
– खोबरे किसून मंद आचेवर फिकट गुलाबी रंगावर भाजावे व थंड झाल्यावर हाताने कुस्कुरावे.
– खसखस भाजून घ्यावी.
– खारीक चिरून मिक्सर मधून जाडसर कुटून घ्यावी. साखर दळून घ्यावी.
– एका कढईत एक चमचा तूप घ्यावे व तापल्यावर १/२ चमचा डिंक टाकून मंद आचेवर डिंक परतावा.
– डिंक फुलून गुलाबी झाल्यावर फुललेला डिंक ताटात काढावा.
– नंतर कढईत पुन्हा १ चमचा तूप टाकून त्यात डिंक घालून तळावा, याप्रमाणे सर्व डिंक तळून घ्यावा.
– डिंक थंड झाल्यास हाताने कुस्कुरावा व त्यात भाजलेले खोबरे, खसखस, खारीक, बेदाणे, बदाम, पिठीसाखर, वेलची-जायफळपूड, सुंठ पूड मिसळावी.
– सर्व मिश्रण हाताने मळून घेऊन लाडू वळावेत.
– तयार लाडू सर्व्ह करा.

Laxmi Poojan Chi Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

लक्ष्मीपूजन ची संपूर्ण माहिती

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.
Laxmi Poojan Chya Shubhechha
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?
आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.
या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदुळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.
या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

Narak Chaturdashi Chi Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

नरक चतुर्दशी ची संपूर्ण माहिती

दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
Narak Chaturdashi Chya Shubhechha
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.
श्रीमद्‌भागवतपुराणात अशी एक कथा आहे .
पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. देव व मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा हजार उपवर पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला.
श्रीकृष्णाला ही बातमी समजताच सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन त्याने असुरावर हल्ला केला. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्ता केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, `आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. या प्रकारे कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
त्यामुळे आश्वििन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ता चा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच नंदाने त्यास मंगलस्नान घातले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

Dhantrayodashi Chi Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.
Dhantrayodashi Chya Shubhechha
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतो. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

धन्वंतरि जयंती
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

Vasubaras Chi Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

वसुबारस ची संपूर्ण माहिती

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा
केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन)
त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या
हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
Vasubaras Chya Shubhechha
आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. पाहू कसा साजरा केला जातो हा दिवस
असा साजरा करावा हा सण
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
गायीच्या पायावर पाणी टाकावे.
गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
वासराची अश्यारिती पूजा करावी.
निरांजनाने ओवाळून घ्यावे.
गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.
या दिवसाचे काही नियम
स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.

आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात.

Subscribe

Loading