Smita Haldankar - Wishes, Greetings


Tulasi Chi Aarti Lyrics

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 16
Loading...

।। श्री तुळशीची आरती ।।

जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळसी ॥ ध्रु० ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थें शाखापरिवारीं ।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ जय देवी जय० ॥ १ ॥
शीतल छाया भूतलव्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तूझ शुभ कार्तिकमासीं ॥ जय देवी० ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ जय देवी जय० ॥ ३ ॥

Sant Gadge Maharaj Inspirational Quotes

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 7
Loading...

संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.”
Quote 2. “आई बापची सेवा करा.”
Quote 3. “जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.”
Quote 4. “दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका”
Quote 5. “दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.”
Quote 6. “दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.”
Quote 7. “धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.”
Quote 8. “माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.”
Quote 9. “माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.”
Quote 10. “विद्या शिका आणि गरिबाले विद्ये साठी मदत करा.”
Quote 11. “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.”
Quote 12. “शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.”
Quote 13. “सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी)”
Quote 14. “हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका.”

Mahatma Jyotiba Phule Inspirational Quotes

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 9
Loading...

महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
Quote 2. “कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
Quote 3. “दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.”
Quote 4. “देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.”
Quote 5. “मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.”
Quote 6. “मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”
Quote 7. “मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.”
Quote 8. “मूर्तीपूजा करू नका.”
Quote 9. “सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.”
Quote 10. “स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.”
Quote 11. “स्व कष्टाने पोट भरा.”
Quote 12. “स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.”
Quote 13. “सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”

Subscribe

Loading