जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! शुभ रात्री
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही शुभ रात्री
मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे…… माणसाने ती करायला शिकलं पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही..!! तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!! शुभ प्रभात आपला दिवस आनंदी जावो
काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावे असंच वाटतं काही नाती असतातचं एवढी गोड की ती कधी संपूच नये असंच वाटतं आणि.. काही माणसं असतातच एवढी “आपली” की ती नेहमी आपलीच असावीत असंच वाटतं.