मला आवडतो पाऊस, गुलमोहराला फुलावणारा, अन, तेवढ्याच मायेने, बाभळीला हि झुलवणारा।
पावसाचे आघात झेलूनच माती बनते सुगंधी, तिचा गोडवा पसरताच वातावरण होते आनंदी।
आवडतं मला पावसात चिंब चिंब भिजणं अनुभवते मी बीजाचं अंकुरण्यासाठी रुजणं…
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे. त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव, आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ हळव्या मनाला आसवांची साथ उधाण आनंदाला हास्याची साथ तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ